‘ईश्वर सत्य आहे’ असे म्हणण्याऐवजी ‘सत्य ईश्वर आहे’ असे मी म्हणू लागलो आहे. हेच मला जास्त न्यायाचे वचन वाटते. सत्यावाचून या जगात इतर काही नाही
ईश्वराला सत्ताचालक म्हणून ओळखण्याने बुद्धीचे समाधान होत नाही. विचार करता करता एक दिवस असे मनात आले की, ईश्वर सत्य आहे असे म्हणणे हेही अपूर्ण वचन आहे, सत्य हेच ईश्वर आहे, हे वचन, मनुष्याची वाचा ज्या मर्यादेपर्यंत जाऊन पोचू शकते तेथपर्यंत, पूर्ण वचन आहे. तिन्ही त्रिकाळी जे असू शकते असे सत्यच असणार, कारण ‘सत्’ म्हणजे असणे. पण, सत्यालाच ईश्वर म्हणून ओळखल्याने श्रद्धा कमी होण्याचे कारण नाही.......